breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
#COVID19: पिंपरी-चिंचवडमधील नर्स कोरोनाबाधित; अन्य ३० नर्स क्वॉरंटाईनमध्ये!
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पुण्यातील रुबी हॉस्पिटलमधील 48 वर्षीय नर्सला कोरोनाची बाधा झाली आहे. संबंधित नर्स पिंपरी-चिंचवड येथे राहते. काही दिवस रजेवर असलेली ही नर्स तीन दिवसांपूर्वीच कामावर रुजू झाली होती. दरम्यान, कामावर असताना तिला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर केलेल्या तपासणी अहवालात तिला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.
संबंधित नर्सला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयातील 30 नर्सना होम क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे, अशी माहिती समोर आली आहे.