लॉकडाऊनमध्ये अर्जुन रामपालने ‘असा’ केला गर्लफ्रेंड गॅब्रिएलाचा वाढदिवस साजरा
कोरोनामुळे संपूर्ण जगाची गती मंदावलीये.सर्व व्यवहारही ठप्प झाले आहे…मुंबईतदेखील अशीच परिस्थिती आहे. मुंबईत दररोज अनेक कार्यक्रम आणि चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असतं. मात्र आता सर्व काही थांबलंय. सर्व स्टार्सही मुंबईतील लॉकडाऊन फॉलो करतायत. लॉकडाऊनमुळे कोणलाही आपलं घर सोडता येत नाहीये. अशात अनेक स्टार त्यांचे वाढदिवस घरातच साजरा करत आहेत.
नुकताच अभिनेता अर्जुन रामपालने त्याच्या गर्लफ्रेंड गॅब्रिएलाचा वाढदिवस साजरा केला. लॉकडाऊनमुळे सध्या बाहेर वाढदिवस करणं शक्य नसल्यानं काल घरीच दोघांनी छोटसं सेलिब्रेशन केलं. गॅब्रिएलाच्या वाढदिवसानिमित्त अर्जुनने तिच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोच्या माध्यमातून अर्जुनने गॅब्रिएलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करताना अर्जुनने लिहिले की, ‘माझ्या प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज छोटसं सेलिब्रेशन केलं, लवकरत मोठी पार्टी करू. लव्ह यू.’
यापूर्वी गॅब्रिएलाने मुलगा एरिक आणि अर्जुनचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला होता. या फोटोमध्ये बाप- लेकाचं खास बॉण्डिंग दिसत आहे. यात अर्जुन मुलगा आरिकसोबत गिटार घेऊन बसलेला दिसत आहे. तो आरिकला गिटार शिकवत असावा असंच या फोटोमधून वाटतं.
अर्जुनचा मुलगा सहा महिन्यांचा आहे. हा फोटो पाहून अर्जुन त्याच्या मुलाच्या मनात आतापासूनच संगीताची आवड निर्माण करत आहे. फोटोत आरिकही फार आवडीने वडिलांच्या गिटारकडे पाहताना दिसत आहे.