Jan Dhan Account: महिलांच्या जन धन खात्यान शुक्रवारी ‘एव्हढी’रक्कम जमा होणार; केंद्र सरकरचा निर्णय
नवी दिल्ली । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
लॉकडाऊनच्या या कठीण काळात गरिबांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये जाहीर करण्यात आहे. त्याअंतर्गत महिलांच्या जन धन खात्यांना तीन महिन्यांसाठी दरमहा 500 रुपये मिळणार आहेत.
त्यामुळे जनधनअतंर्गत महिला खाते लाभार्थींच्या खात्यामध्ये आता 500 रुपये पहिला हप्ता शुक्रवारी जमा होईल. कोरोना विषाणूच्या साथीला आळा घालण्यासाठी सरकारने 25 मार्चपासून देशभरात 21 दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे.
सोशल डिस्टंसिंग राखण्यासाठी आणि लाभार्थ्यांनी पैसे काढणे सुनिश्चित करण्यासाठी या महिन्यात या रुपयांचे वितरण करण्याच्या वेळापत्रकांचे पालन बँका करतील. वेळापत्रक लाभार्थ्यांच्या बँक खात्यातील अंतिम क्रमांकावर आधारित आहे. वेळापत्रकानुसार जन-धन खाते ज्याचा शेवटचा अंक 0 किंवा 1 आहे तो 3 एप्रिल 2020 रोजी बँकेत जाऊन रक्कम काढू शकेल.
त्याचप्रमाणे जन-धन खाती ज्यांचा खाते क्रमांक शेवटचा अंक 2 किंवा 3 आहे ते खातेदार 4 एप्रिल 2020 रोजी रक्कम काढू शकतात. या व्यतिरिक्त ज्या लाभार्थ्यांचा खाते क्रमांकचा अंतिम अंक 4 किंवा 5 आहे ते 7 एप्रिल २०२० रोजी आणि 8 एप्रिल २०२० रोजी ज्यांच्या खात्यचा शेवटचा अंक 6 किंवा 7 आहे ते खातेदार २० एप्रिल रोजी रक्कम काढून घेऊ शकतात. तथापि, 9 एप्रिल पासून लाभार्थी त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत बँक पैसे काढू शकतात, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.