breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: संचारबंदीचा फायदा घेत चोरट्यांचा दारूच्या दुकानावर डल्ला

करोना विषाणू संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर गर्दी टाळण्यासाठी सर्वत्र संचारबंदी पुकारण्यात आली असतानाच चोरट्यांनी घरे,  दुकाने फोडण्याचे प्रकार सुरू केले आहेत. संचारबंदी काळात मद्यपी मंडळींना दारूची तलफ भागविणेही कठीण झाले असताना चोरट्यांनी दारूचे दुकानही फोडले आहे.

सोलापूर शहरात विजापूर रस्त्यावर कोणार्क नगरात गुलमोहोर वाईन शॉप नावाचे दुकान दहा दिवसांपासून बंद आहे. सर्वत्र संचारबंदीचा अंमल सुरू असताना चोरट्यांनी ही संधी साधून हे दुकान फोडले. दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्याचा साठा लंपास केला. तसेच बंद दुकानातील रोकडही चोरट्यांच्या हाती लागली. एकूण ५७ हजार रूपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या चोरट्यांनी पळवून नेल्या आहेत.

दुकानाचे चालक सोहेल युन्नूस शेख हे कोणार्क नगरात दुकानाजवळच राहतात. संचारबंदी काळात दुकान बंद असताना त्यांचेही दुकानाकडे लक्ष नव्हते. परंतु मंगळवारी पहाटे दुकान फोडण्यात आल्याचे आढळून येताच शेख यांनी पोलिसांत धाव घेतली. विजापूर नाका पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

शहरात संचारबंदी असताना घरफोड्यांचेही गुन्हे घडू लागले आहेत. संचारबंदीमध्ये सार्वजनिक रस्त्यावर वर्दळ थांबली असताना बंद दुकाने व घरांची टेहळणी करून चोरट्यांनी ‘हाथ की सफाई’ करायला सुरूवात केल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button