Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirusimpact: टाटा मोटर्सचा पुण्यातील प्रकल्प काही दिवस बंद

कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा फटका छोट्या-मोठ्या उद्योगांना फार मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. कार उत्पादनातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने आपल्या पुण्यातील प्रकल्पातील काम मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूचे संक्रमण वाढतच राहिले तर पुढील काळात हा प्रकल्प काही दिवसांसाठी बंदही ठेवण्यात येऊ शकतो. कंपनीकडून ही माहिती देण्यात आली.

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या कोरोना विषाणूबाधित ६३ रुग्ण आहेत. त्यामुळे कंपनीने पुण्यातील प्रकल्पासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. टाटा मोटर्सकडून जॅग्वार आणि लँड रोव्हर या दोन लक्झरी गाड्यांची निर्मिती केली जाते.

महाराष्ट्रात शुक्रवारी रात्रीपासून ३१ मार्चपर्यंत राज्यातील सर्व दुकाने, कार्यालये, कारखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानेच या काळात सुरू राहणार आहेत. सोमवारपर्यंत टाटा मोटर्सच्या पुणे प्रकल्पातील काम मोठ्या प्रमाणात कमी केले जाणार असून, मंगळवारपासून हा प्रकल्प बंद ठेवण्याची तयारी करण्यात येणार आहे. जर परिस्थिती आणखी चिघळली तर हा प्रकल्प काही दिवस बंद ठेवण्यात येईल, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ग्वांटेर बुश्चेक यांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button