breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शेगाव गजानन महाराजांचे मंदीर दर्शनासाठी बंद
कोरोना विषाणूमुळे राज्यातील अनेक प्रमुख मंदिरांचे द्वार दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. शिर्डी साईबाबा संस्थान न्यासानं आज दुपारी म्हणजे 17 मार्चपासून तीन वाजल्यापासून पुढील सूचना येईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारानं सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे तसेच जमावबंदीचे आदेश दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर न्यासानं भाविकांसाठी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
तर श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव येथील दर्शनही ३१ मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. याचप्रमाणे तुळजाभवानीचे दर्शन आणि मुंबईतील प्रसिध्द सिध्दीविनायक मंदिरही बंद ठेवण्यात आलं आहे…