दुबईवरून आलेल्या दोन संशयित कोरोनाग्रस्त रुग्णांची चंद्रपुरात नोंद
चंद्रपूर | चंद्रपूर मध्ये दुबईवरून आलेल्या दोन संशयित कोरोनाग्रस्त दांपत्याची माहिती आज प्रशासनाला मिळाली आहे . त्यानंतर या संदर्भात विशेष काळजी घेत या दोन्ही ही रुग्णांना योग्य ती वैद्यकीय सेवा पुरविण्याबाबत व पुरविली जात असल्याबाबत प्रशासनाने खात्री केली हे दोन्ही रुग्ण धोक्याबाहेर असून त्यांना केवळ निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
कोरोना आजारा संदर्भात जिल्हा प्रशासनाने आज हॉटेल्स व रिसॉर्ट मालकांची बैठक घेऊन विदेशी पर्यटक, विदेशातून आलेल्या नागरिकांची नोंद करून प्रशासनाला कळविण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे दुबईवरून आलेल्या दोन रुग्णांची नोंद करण्यात आली. रुग्ण धोक्याबाहेर असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने कोरोना आजारा संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजना मोठ्या प्रमाणात सुरू केल्या आहे.
काल येथील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या महांकाली यात्रेला स्थगिती देण्याबाबतचा निर्णय प्रशासनाने घेतला. या निर्णयाला भक्तांच्या आरोग्याची काळजी म्हणून आयोजन व्यवस्थेत असणार्या सर्वांनी पाठबळ दिले आहे. त्यानंतर ताडोबा येथे येणार्या देश-विदेशातील पर्यटकांच्या मार्फत कोणत्याही प्रकारे कोरोना विषाणूचे संसर्ग इतरांना होऊ नये, यासाठी आज सर्व रिसॉर्ट व हॉटेल्स मालकांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी घेतली. त्या बैठकीमध्ये येणार्या प्रत्येक पर्यटकाची माहिती प्रशासनाला देण्याबाबत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.
विशेषत: परदेशातून आलेल्या व विदेशी पर्यटकांच्या बाबतीत अधिक काळजी घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान सामान्य नागरिकांना एकमेकांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले असून खोकल्यावर अथवा शिंकल्यावर, एखाद्या आजारी व्यक्तीची काळजी घेताना, स्वयंपाक करण्यापूर्वी, तयार करताना आणि केल्यानंतर, जेवणापूर्वी, शौचानंतर, प्राण्यांचा सांभाळ केल्यानंतर आणि प्राण्यांची विस्तार काढल्यानंतर आपले हात स्वच्छ धुण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर मध्ये दुबईवरून आलेल्या दोन संशयित कोरोनाग्रस्त दांपत्याची माहिती आज प्रशासनाला मिळाली त्यानंतर या संदर्भात विशेष काळजी घेत या दोन्ही ही रुग्णांना योग्य ती वैद्यकीय सेवा पुरविण्याबाबत व पुरविली जात असल्याबाबत प्रशासनाने खात्री केली हे दोन्ही रुग्ण धोक्याबाहेर असून त्यांना केवळ निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.