#CoronaVirus: दिल्लीच्या कंपनीतील ७०० जणांबाबत दक्षता
नॉयडा | महाईन्यूज
बृहत नॉयडात एका चामडय़ाच्या वस्तूच्या कंपनीत काम करणाऱ्या ७०० जणांना करोना संसर्गाच्या शक्यतेने देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या कंपनीचा संचालक करोना चाचणी सकारात्मक आल्याने आजारी आहे. ४६ वर्षांचा हा संचालक इटली व स्वित्झर्लंडला जाऊन नंतर भारतात आला आहे, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी अनुराग भार्गव यांनी दिली आहे.
या रुग्णास अशक्तपणा आला असून त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला असता चाचणी सकारात्मक आली आहे. पण तरी तो कंपनीत येत राहिला. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना संसर्ग झाल्याची शंका असून एकूण ७०७ कर्मचारी तेथे काम करतात. त्याच्या कुटुंबीयांपैकी सर्वानाच देखरेखीखाली ठेवण्यात आले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे र्निजतुकीकरण करण्यात आलेले आहे. देखरेखीखाली असलेल्या लोकांच्या आरोग्य विभाग संपर्कात असून कुणालाही लक्षणे दिसली तर चाचणी केली जाईल. ज्याची चाचणी सकारात्मक आली तो कंपनीत बराच काळ येत होता पण तो त्याच्या खोलीत बसत होता. दरम्यान, तिकीट रद्द करणे अथवा प्रवासाच्या वेळापत्रकात फेरफार यासाठी घेण्यात येणारा आकार रद्द करावा अथवा सवलत द्यावी, अशा सूचना नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना एका परिपत्रकाद्वारे केल्या आहेत.