Breaking-newsताज्या घडामोडी

धक्कादायक! तिने घेतली रेल्वेसमोर उडी… नागपूर रेल्वेस्थानकावर खळबळ

नागपूर | महाईन्यूज

एका महिलेने रेल्वे रुळावर उडी घेऊन सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. लोकोपायलटने वेळीच गाडी थांबविली. त्याच वेळी एका तरुणाने महिलेला फलाटावर ओढले. जीवाचा थरकाप उडविणारी ही घटना सोमवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मोमिनपुरा येथील रहिवासी कल्पना (वय ५५, बदललेले नाव) सोमवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकावर आली. ती प्लॅटफार्म क्रमांक ६ वर मुंबई एण्डच्या दिशेने गेली. त्याच वेळी २२६२० तिरुनेलवेल्ली-बिलासपूर एक्स्प्रेस प्लॅटफार्मवर येत होती. प्रवासी गाडीच्या प्रतीक्षेत होते. कल्पनाही प्रवाशांसह प्लॅटफॉर्मवर थांबली होती. गाडी स्टेशनच्या आत पोहोचली. गाडी जवळ येत असतानाचे पाहून कल्पनाने रेल्वे रुळावर उडी घेतली.

लोकोपायलट आर.पी. सरदार, सहायक लोकोपायलट डी. मंडल यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच ब्रेक लावला. काही वेळातच गाडी थांबली. गाडी थांबली तेव्हा कल्पना आणि गाडी यांच्यातील अंतर केवळ एक ते दीड फुटाचे होते. त्याच वेळी जरीपटका निवासी राम पंजवानी हा तरुण वडिलांना सोडायला आला असता त्याने कल्पनाला मदतीचा हात देऊन प्लॅटफार्मवर ओढले. घटनेची माहिती मिळताच उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव आणि सतीश ढाकणे यांनी लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाला सूचना दिली. त्यानुसार लोहमार्ग पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल संजय पटले घटनास्थळी पोहोचले. महिलेला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. कल्पनाला एक मुलगा आहे. ती तणावात घरून निघाल्याचे समजते. काही वेळानंतर ती शांत होताच लोहमार्ग पोलिसांनी तिला घरी पोहोचविले आहे. दरम्यान, आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक चंद्रभान अहिरवार, एस. पी. सिंग प्लॅटफॉर्मवरून जात असताना त्यांनी महिलेची आस्थेनी विचारपूस करून तिला दिलासा दिला. गाडीचे गार्ड ए.के. चौधरी यांनीही कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group