Breaking-newsपिंपरी / चिंचवड

स्व.रमणनाना पवार यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त किर्तनाचा कार्यक्रम

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

ताथवडे येथील मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय रमणनाना रामचंद्र पवार यांचे आठव्या पुण्यस्मरणानिमित्त किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

ताथवडे येथील रघुनंदन मंगल कार्यालयामागील राहत्या घरी मंगळवार (दि.10) किर्तन होणार आहे. यामध्ये सकाळी 8 ते 10 वाजता विठ्ठल नाम जप हभप नितीन महाराज काकडे हे सादर करणार आहेत. तर सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत हभप अक्रुर महाराज साखरे (बीड) यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. या किर्तनास साथ ताथवडेतील सर्व प्रवचनकार, किर्तनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, भजनी मंडळ देणार आहेत.

तरी या किर्तनाचा ताथवडे पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी महापालिकेच्या माजी नगरसेविका यमुनाताई रमणनाना पवार, राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button