कोण आहे सुदर्शन चक्रपाणी?,  स्वप्नील जोशी का घेतोय या व्यक्तीचा शोध?

कोण आहे सुदर्शन चक्रपाणी?, स्वप्नील जोशी का घेतोय या व्यक्तीचा शोध?

सतीश राजवाडे दिग्दर्शित “समांतर” या वेब सिरीजचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. या वेबसीरिजच्या निमित्ताने सतीश राजवाडे आणि स्वप्नील जोशी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे या सीरिजमधून स्वप्नील वेब विश्वात पदार्पण केलं आहे.

टीझरमध्ये स्वप्नील कुमार महाजन ही भूमिका साकारणार आहे . या कहाणीमध्ये तो स्प्लिट पर्सनॅलिटी या मानसिक आजाराचा शिकार असून, सुदर्शन चक्रपाणी अशा त्याच्या मनाने तयार केलेल्या व्यक्तीला शोध घेताना पहायला मिळतोय…

टीझर पाहून या वेब सिरीजची कथा अतिशय रोमांचक आणि सस्पेन्सने भरलेली दिसतेय… स्वप्नीलची ही नवी भुमिका आणि नवी कथा प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल हे नक्की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *