युवासेनेकडून महिला दिनानिमित्त महिला सफाई कामगारांचा सत्कार
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी युवासेना व दक्षता फॉउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आज पिंपरी-चिंचवड शहरातील सफाई कामगार महिलांचा गौरव करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशात अग्रस्थानी आहे. हे केवळ सफाई कामगार महिलांनी दिलेल्या योगदानामुळे शक्य झाले आहे. शहरात आरोग्यदायी वातावरण निर्माण करून शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्वाचे कार्य सफाई कामगारांमार्फत केले जाते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पिंपरी युवासेनेच्या वतीने सफाई महिला कामगारांचा गौरव करण्यात आला.
यावेळी कैलास लांडे, अंकुश जाधव, कैलास गायकवाड, मैत्री ग्रुपचे रवी कांबळे, जितेंद्र चव्हाण, गोरख नेटके, विनोद लोहिरे, अविनाश जाधव, रोहित गोरे, ज्ञानेश्वर मते, नाझिया बेग, विजेता चव्हाण, ज्योती पाटील, शीतल पवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमचे आयोजन युवासेना विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला बचतगटाच्या शीला जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदू काची यांनी केले.