breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
Udhav Thakare VS Nitesh Rane : लाज वाटली नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना…नितेश राणेंची ‘सोशल धुलवड’
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
अयोध्येतील राम मंदिर उभारणीला शिवसेनेच्या वतीने १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत नुकतीच घोषणा केली. मात्र, आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘मुलाच्या पेग्विंन हट्टासाठी ४५ कोटी रुपये, पण राम मंदिरासाठी फक्त कोटी रुपये,’ असा सवाल करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. राणे यांनी एक ट्विट केलं आहे. ‘लाज नाही वाटली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त एक करोड रुपये जाहीर करताना, मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी पण राम मंदिराला फक्त एक कोटी???,’ असं नितेश राणे म्हणाले आहेत.
निलेश राणे यांच्या ‘सोशल धुलवडी’नंतर आता शिवसेना त्यांना काय प्रत्त्युतर देणार याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.