पिंपरी युवासेनेतर्फे दहावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आजपासून सुरू झाली. परीक्षेत कोणत्याही प्रकारचे मनावर दडपण ने घेता विद्यार्थ्यांनी पेपर पूर्ण सोडवावा, विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढावे, यासाठी युवासेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना पेन आणि फुल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
पिंपरी युवासेनेतर्फे व आशीर्वाद महिला बचत गटातर्फे स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थ्यांना पेन व फुल भेट देण्यात आली. दहावीची परीक्षा ह्या विद्यार्थी जीवनातील महत्वाचा टप्पा असतो. तेंव्हा मुलांनी न डगमगता या आव्हानाला स्वीकारावे व प्रसन्न मनाने परीक्षा द्यावी, असे आवाहन पिंपरी युवासेना विभाग संघटक निलेश हाके यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके यांच्यासह आशीर्वाद महिला बचत गटाच्या शीला जाधव, अविनाश जाधव, नंदू काची आदी उपस्थित होते.