Crime : किरकोळ कारणांवरून एकाच कुटुंबातील चारजणांवर चाकूने वार
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
व्हरांड्यात पाय पसरून बलेल्या तरुणाला पाय बाजुला सारण्यास सांगितल्याने त्यांने भांडण काढून चारजणांवर चाकुने वार करून बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी सहाच्या सुमारास चिखली घरकूल येथे घडली.
राजेंद्र बारकू पाटील (वय 42, रा. घरकुल चिखली), सरस्वती पाटील, सागर पाटील, साहिल पाटील अशी जखमींची नावे आहेत. राजेंद्र पाटील यांनी शनिवारी (दि. 29) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश बाबुराव अडागळे (वय २६, रा. घरकुल चिखली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी घरकुल येथे एकाच इमारतीमध्ये शेजारी शेजारी राहतात. शुक्रवारी सायंकाळी आरोपी इमारतीच्या सातव्या मजल्यावरील व्हरांड्यात पाय पसरवून बसला होता. त्यावेळी फिर्यादी तिथून जात होते. त्यांनी आरोपीला पाय बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून आरोपीने घरातून चाकू आणला आणि राजेंद्र यांच्या डोक्यात वार केले. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी सरस्वती, दोन मुले यांच्यावर देखील चाकूने वार करून जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.