पुरुष संघात “कॅलिस्टो” तर महिला संघात “डायनॅस्टी डेअरड्रीमर्स” वाकड प्रीमियर लीगचे मानकरी
वाकड प्रीमियर लीगच्या क्रिकेटचे अंतिम सामने उत्साहात
पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|
विनायकदादा गायकवाड युथ फाउंडेशन आयोजित वाकड प्रीमियर लीग क्रिकेटचे पुरुष-महिला गटाचे अंतिम सामना आज (सोमवारी) उत्साहात पार पडले. या स्पर्धेत महिला गटातून डायनॅस्टी सोसायटीने तर पुरुष गटातून कॅलिस्टो सोसायटीने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
वाकड प्रीमियर लीग सीझन – 3 मधील क्रिकेटचा अंतिम सामना आज पार पडला. तब्बल दोन महिने हे सामने सुरु होते. या स्पर्धेत पुरुषांचे ९८ संघ आणि महिलांचे २३ संघ सहभागी झाले होते. हे क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, मुले-मुली महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेतील महिला संघात प्रथम क्रमांक डायनॅस्टी सोसायटीने, व्दितीय क्रमांक अक्षय टॉवर तर तृतीय क्रमांक कास्प काऊंटी या सोसायटीने पटकाविला आहे. पुरुष संघात प्रथम क्रमांक कॅलिस्टो सोसायटी, व्दितीय क्रमांक अक्षय टॉवर तर तृतीय क्रमांक कावेरीनगर क्रिकेट क्लब या संघाने मिळविला आहे.
विजेत्या स्पर्धकांना स्थायी समिती माजी सभापती तथा नगरसेविका ममताताई विनायक गायकवाड, रुबरु मिस्टर इंडिया श्रीकांत द्विवेदी यांच्या हस्ते चषक,प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. यावेळी अनेक संघाच्या सभासदांनी आपल्या भावना व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ममता गायकवाड म्हणाल्या कि “मी सर्वप्रथम आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, विनायक गायकवाड यांच्यातर्फे वाकड प्रीमियर लीगच्या सर्व विजयी संघाचे अभिनंदन आणि सर्व सहभागी टीमचे आभार मानते. आपण सर्वानी एकत्र येऊन हि स्पर्धा यशस्वी केली. सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व सोसायटी सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने वाकड प्रीमियर लीगचे यश आहे. याप्रसंगी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे सभासद, परिसरातील सोसायटीमधील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.