Breaking-newsआंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांच्याविरोधात साक्ष देणाऱ्या तिघांची हकालपट्टी

महाभियोग सुनावणीवेळी विरोधात साक्ष देणाऱ्या तीन अधिकाऱ्यांची अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हकालपट्टी केली आहे. या अधिकाऱ्यांनी अमेरिकी काँग्रेसने महाभियोग प्रकरणी नेमलेल्या समितीसमोर जाऊन ट्रम्प यांच्या विरोधात साक्ष दिली होती. सिनेटमध्ये महाभियोग सुनावणीत दोषमुक्त झाल्यानंतर दोनच दिवसात ट्रम्प यांनी या दोन अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलेला आहे.

अमेरिकेचे युरोपीय समुदायातील राजदूत गॉर्डन सोंडलँड व राष्ट्रीय सुरक्षा मंडळातील युक्रेनविषयक तज्ञ लेफ्टनंट कर्नल अलेक्झांडर विंडमन अशी हकालपट्टी केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. सोंडलँड यांनी शुक्रवारी सांगितले होते की, युरोपीय समुदायातील अमेरिकेचे राजदूत म्हणून आपणास माघारी बोलावण्यात आले आहे. विंडमन यांच्या वकिलाने सांगितले की, विंडमन यांना सत्य सांगितल्याबद्दल राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. विंडमन यांचे जुळे बंधू व व्हाइट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्षा मंडळाचे सल्लागार लेफ्टनंट कर्नल येवगनी विंडमन यांनाही ट्रम्प यांनी घरचा रस्ता दाखवला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button