Breaking-newsराष्ट्रिय

Delhi Election 2020 : अर्ध्याहून अधिक उमेदवार फक्त बारावी पास, 16 अशिक्षित

नवी दिल्ली | महाईन्यूज

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीमध्ये नशीब आजमावणारे 51 टक्के उमेदवार हे फक्त बारावी पास असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेच्या संशोधनातून पुढे आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एडीआरने आपल्या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून अनेक बाबी समोर येत आहेत. आपल्या भागातील लोकप्रतिनिधी निवडताना लोकांपुढेच प्रश्न निर्माण होईल अशाही बाबी या अहवालात नमूद केलेले आहेत.

दिल्लीतून गुन्हेगारीचा नायनाट करण्याचे वचन देऊन निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवरच गंभीर गुन्हे असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली आहे. त्यानंतर आता अर्ध्याहून अधिक उमेदवार फक्त बारावी पास असल्याची माहिती मिळत आहे. एडीआरच्या अहवालानुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांपैकी 340 म्हणजे तब्बल 51 टक्के उमेदवारांचे शिक्षण पाचवी ते बारावीपर्यंत आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांसोबतच इतर सर्वांचाच समावेश आहे. 16 उमेदवार हे पूर्णपणे अशिक्षित असल्याची माहिती पुढे आली आहे. 298 उमेदवार म्हणजे 44 टक्के उमेदवार पदवीधर किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत. बारा उमेदवारांकडे पदविका आहे तर सहा उमेदवारांची शिक्षित म्हणून नोंद घेण्यात आलेली आहे. मुख्य म्हणजे या संपूर्ण परिस्थितीत 90 उमेदवार पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आणि 11 उमेदवार आचार्यपदवी घेतलेले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button