Breaking-newsपिंपरी / चिंचवड
रहाटणीतील न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये महात्मा गांधींना अभिवादन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, राजेश गायकवाड, रोहिदास भालेराव यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस रोहिदास भालेराव व संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूंवर आपले मनोगत व्यक्त केले.
अनिता रोडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.





