Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
काॅंग्रेसच्या महिला मंत्र्याचे धक्कादायक विधान, आमचे खिसे अजून गरम व्हायचेत.

विरोधकाच्या लक्ष्मीदर्शनाने पंजाला मत द्या, कॅबिनेटमंत्री यशोमती ठाकूर यांचे वक्तव्य
वाशिम – आमचे खिसे आणखी गरम व्हायचे आहेत. विरोधकांचे खिसे मात्र पाच वर्षात गरम झाले असून मतदारांनी त्यांच्या कडून लक्ष्मीदर्शन करून घ्यावे, मात्र मत पंजाला द्यावे असे खळबळजनक वक्तव्य कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
वाशिमच्या कामरगाव येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. महाविकास आघाडीचे खातेवाटप अखेर ठरले आहे. या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विरोधक दिवसागणिक आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामुळे नव्या मंत्र्यांची जबाबदारी देखील वाढली आहे.
दरम्यान, सत्ता आणि मंत्रीपद हे खिसे गरम करून घेण्यासाठी व त्यातून निवडणुक लढविण्यासाठी असतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.





