Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘नवरदेव बोहल्यावर चढताच पळाला’, ‘अजून मोठ्या घडामोडी घडणार’ – खासदार गिरीश बापट

पुणे | महाईन्यूज

शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या राज्यमंत्री पदाच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी सत्तारांवर टिका केली आहे. ”नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच पळाला”, अशा शब्दात बापट यांनी सत्तार यांना चिमटे काढले आहेत. सत्तारांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात असलं, तरी शिवसेनेकडून मात्र याचा इन्कार केला आहे.

ऐकीव बातम्यांवर मी प्रतिक्रिया देत नाही. तीन पायांच्या शर्यतीत अजून खूप मोठ्या घडामोडी घडणार आहेत. सरकार स्थापन होऊन काम सुरु व्हायच्या आधीच मंत्रिमंडळात किती अस्थितरता, चलबिचल आहे, याची प्रचिती सत्तारांना आली’ असं गिरीश बापट म्हणाले.

‘कोणाला काय काम दिलं, कोणतं खातं दिलं, हा आमचा विषय नाही. भविष्यकाळात काय वाढून ठेवलंय, कसं चालणार, याची छोटीशी चुणूक राजीनाम्यामुळे दिसल्याचं बापट म्हणाले. ते पुण्यात एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

बापट म्हणाले की, अब्दुल सत्तारांनी खरंच राजीनामा दिला असेल, तर ही फक्त सुरुवात आहे. हे म्हणजे नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच पळाल्यासारखं आहे. हे तीन तिघाडी सरकार असंच चालणार असेल, तर हे राज्याचं दुर्दैव आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group