पॉर्नस्टार मिया खलिफाचा फोटो शेअर करत पाकिस्तानी मंत्र्याची भारतावर टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/malik-pak-Frame-copy-1.jpg)
भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी गेलेले पाकिस्तानचे खासदार अब्दुल रेहमान मलिक सोशल मीडियावर स्वत:च ट्रोल झाले आहेत. अब्दुल रेहमान मलिक यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारी महिला म्हणून चक्क पॉर्नस्टार मिया खलिफाचा फोटो शेअर केला आहे. अब्दुल रेहमान यांनी हे ट्विट केल्यानंतर काही वेळातच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागलं.काही वेळानं रेहमान यांना आपली चूक समजल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलिट केलेलं आहे. परंतु त्यांनी ट्विट डिलिट करेपर्यंत त्या ट्विटचे स्क्रिनशॉट व्हायरल झालेले होते.
ट्विट करून ते पुन्हा डिलिट केल्यानंतरही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. स्थानिक भारतीय चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींनी हिजाब परिधान करून सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या भारतील मुस्लिम नागरिकांसोबत एकी दाखवली, अशा आशयाचं ट्विट एका युझरनं केलं होतं. यासोबत त्या युझरनं हिजाब परिधान केलेल्या तीन महिलांचे फोटोदेखील लावले होते. यामध्ये पॉर्नस्टार मिया खलिफा आणि नादिया अली यांचेदेखील फोटो होते.
![](https://i0.wp.com/mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/tweet-.jpg?fit=684%2C1024&ssl=1)