पुण्यात सीएए, एनआरसी विराेधात माेर्चा; हजाराे मुस्लिम बांधव रस्त्यावर
पुणे |महाईन्यूज|
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि नागरिकत्व संशाेधन विधेयक (एनआरसी) च्या विराेधात देशभरात आंदाेलने हाेत आहेत. आज पुण्यात ‘कुल जमाते तंजिम’ या संघटनेच्यातर्फे ‘संविधान बचाव’ माेर्चा काढण्यात आला.
पुण्यातील गाेळीबार मैदानापासून या माेर्चाला सुरुवात झाली. या माेर्चात हजाराे मुस्लिम नागरिक सहभागी झाले हाेते. विधानभवन परिसरात या माेर्चाचे सभेत रुपांतर झाले. या माेर्चात तरुण आणि महिलांची संख्या लक्षणीय हाेती.
सीएए आणि एनआरसी या दाेन कायद्यांना देशभरात विराेध हाेत आहे. देशभरात विविध ठिकाणी माेर्चे, आंदाेलने हाेत आहेत. हे दाेन्ही कायदे संविधानाच्या विराेधात असून ते मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे. आझादी, इंकलाब जिंदाबाद, संविधान जिंदाबाद अशा घाेषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमा आणि भारतीय ध्वज हातात धरण्यात आला हाेता.
पाेलीस बंदाेबस्त देखील तैनात करण्यात आला हाेता. या माेर्चात विविध सामाजिक संघटनांनी देखील सहभाग घेतला. सीएए आणि एनआरसी हे दाेन्ही कायदे संविधानाच्या विराेधात असून ते मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्रच राहू देण्याची मागणी देखील करण्यात आली.