breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
जम्बो ब्लॉकमुळे प्रवासी बेजार; स्टेशन प्रबंधक कार्यालयाबाहेर गोंधळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/local-train-Frame-copy.jpg)
कल्याण | नाताळ सणाच्या दिवशी अनेक कार्यालयांना असणारी सुट्टी पाहता मध्य रेल्वे मार्गावर येणाऱ्या ठाकुर्ली स्थानकातील पादचारी पुलाच्या गर्डरचं काम करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. परिणामी २५ डिसेंबरच्या दिवशी कल्याण- डोंबिवसी येथील जलद मार्गासह पाच आणि सहा क्रमांकांच्या मार्गिकेवरही विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. ज्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. सध्याच्या घडीला या स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून, एकच गोंधळ पाहायला मिळत आहे.
काही संतप्त प्रवाशांनी स्टेशन प्रबंधकांच्या कार्यालयाबाहेर गर्दी करत तेथे गोंधळ घातल्याचंही पाहायला मिळत आहे. काही वर्ग वगळल्यास उर्वरित चाकरमानी वर्गाला या ब्लॉकचा फटका बसत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या या कारभारामुळे प्रवासी पुन्हा बेजार झाले आहेत.