breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
11 हजार मराठा तरुणांना 550 कोटी रुपयांचे कर्जवाटप : नरेंद्र पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला नागपुरात बोलावून अधिवेशनादरम्यान महामंडळाचा आढावा घेतल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे. महामंडळ अजून गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा जवाबदारी सांभाळण्यास सांगितले असल्याचेही पाटील यांनी म्हटले. राज्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अमराठी बँक व्यवस्थापक असल्याने, कर्जमंजुरी होण्यास अडचणी येत असल्याचा दावा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला.