breaking-newsपुणेमहाराष्ट्र
राज्यात ‘आयटीआय’च्या २९ हजार ९५९ जागा रिक्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/iti-students.jpg)
पुणे:- राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत २९ हजार ९५९ जागा रिक्त राहिल्या आहेत. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतून १ लाख १८ हजार २८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रिक्त जागा जवळपास १० हजारांनी वाढल्या आहेत.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयटीआयसाठीची प्रवेश प्रक्रिया राबवली होती. सरकारी आणि खासगी आयटीआय मिळून राज्यात १ लाख ४८ हजार २४६ जागा उपलब्ध होत्या. त्यातील २९ हजार ९५९ जागा रिक्त राहिल्या.
यापैकी १९ हजार ९४९ जागा खासगी आयटीआयमध्ये, तर १० हजार १० जागा शासकीय आयटीआयमध्ये रिक्त राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी एकूण २० हजार जागा रिक्त राहिल्या होत्या.