नागरिकांसाठी भोसरीत कायदा सल्ला केंद्र, अॅड. बाळासाहेब थोपटे यांचा पुढाकार
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भोसरीतील अॅड. बाळासाहेब थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू व्यक्तींसाठी मोफत कायदा सल्ला केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राद्वारे निरनिराळ्या विषयातील तज्ज्ञांकडून कायदेविषयक मार्गदर्शन आणि सल्ला देण्यात येणार आहे.
संबंधीत पक्षकाराकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही. या केंद्रामध्ये कौटुंबिक, मालमत्ता विषयक, आर्थिक, धार्मिक, पोलीस खाते, राज्य, केंद्र सरकार संबंधित, नोकरी, बढती, निवृत्ती इ. विषयक अन्याय, कोर्ट – कचेरीबाबत, प्रदूषण, अपघात विषयक, शाळा, महाविद्यालयातील प्रश्न, ज्येष्ठ नागरिक समस्या आदींवर कायदेशीर सल्ला दिला जाईल.
मात्र, त्यानंतरच्या पुढील कार्यवाहीसाठीचा खर्च ज्यामध्ये अर्ज करणे, आवश्यक दाखला, कागदपत्र मिळवणे, टपाल खर्च आदी खर्च संबंधित पक्षकाराला करावा लागणार आहे. इच्छुक पक्षकारांनी अॅड. बाळासाहेब थोपटे, नोटरी, गुरुकृपा झेरॉक्स, न्यु गवळी कॉम्प्लेक्स, आळंदी रोड कॉर्नर, पुणे – नाशिक रोड, भोसरी येथे सकाळी अकरा ते सायंकाळी पाच यावेळेत भेटावे, असे आवाहन अॅड. थोपटे यांनी केले आहे.