Breaking-newsपुणे

वाघाेलीत रस्त्याच्याकडेला विवाहीतेने केली आत्महत्या ; परिसरात खळबळ

वाघोली : पुणे – अहमदनगर महामार्गाजवळ वाघाेलीमध्ये रस्त्याच्या कडेला एका लाेखांडी राॅडला महिलेचा मृतदेह लटकत असल्याचे दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अहमदनगर येथील नागापूर येथील विवाहीत महिलेने वाघाेली येथे येऊन गळफास घेत आत्महत्या केली. 

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी गणेश तांबे ( वय 28, रा. नागापूर, जिल्हा – नगर ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून ती आपल्या आईसोबत सोमवारी रात्री नागापूरहून पुण्याकडे निघाली हाेती. वाघोली येथे उतरल्यानंतर तिने आईला सोडून पळ काढला. आईने तिचा शोध घेतला. मात्र ती  न सापडल्याने तीची आई परत नगरला गेली. दरम्यान अश्विनी हिने वाघेश्वर कॉम्प्लेक्स जवळील लोखंडी रॉड ला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले. सकाळी हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी ट्रॅफिक नियंत्रण करणाऱ्या वॉर्डनला सांगितले. त्याने पोलीस ठाण्यात ही घटना कळविली. तिच्याकडे एक पर्स आढळून आली. त्यामध्ये आधार कार्ड, वाहन परवाना, डेबिट कार्ड व मोबाईल नंबर आढळून आले.परंतु आत्महत्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button