breaking-newsराष्ट्रिय
पुलवामामध्ये छत्तीसगडच्या कामगाराची दहशतवाद्यांकडून हत्या
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी छत्तीसगडच्या कामागाराची गोळया झाडून हत्या केली आहे. दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये फळे घेऊन जाणाऱ्या एका ट्रक चालकावर गोळीबार केला होता. पाच ऑगस्टला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवले.
त्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये निर्बंध लागू करण्यात आले होते. राज्यात मोठया प्रमाणावर सुरक्षा पथकांना तैनात करण्यात आले आहे. आता काश्मीरमध्ये मोबाइल सेवाही सुरु झाली असून परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. आता दहशतवाद्यांकडून सर्वसामान्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.