breaking-news
पाकिस्तानचे निमंत्रण मनमोहन सिंग स्वीकारणार नाहीत!
कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तान सरकारने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निमंत्रणाचा मनमोहन सिंग स्वीकार करणार नसल्याची माहिती, काँग्रेस सुत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
काही वेळापूर्वीच नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनसाठी इम्रान खान सरकारने मनमोहन सिंग यांना निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली असल्याची बातमी आली होती. विशेष म्हणजे पाकिस्तानने यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण दिले नसल्याने सर्वत्र चर्चा सुरू होती. त्यात आता काँग्रेस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनमोहन सिंग हे पाकिस्तानच्या निमंत्रणाचा स्वीकार करणार नसल्याचे समोर येत आहे.