Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी – चिंचवडमध्ये राजकीय भूकंप ; विलास लांडे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ?

  • मुंबईतील ‘ मातोश्री ‘ च्या दिशेने माजी आमदार विलास लांडे रवाना – 
  • चार नगरसेवक आणि प्रमुख सहकारी सोबत असल्याची माहिती 


पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पिंपरी – चिंचवडच्या राजकारणातील मातब्बर नेते आणि माजी आमदार विलास लांडे यांनी अखेर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपले प्रमुख सहकारी आणि चार नगरसेकांसोबत आज विलास लांडे शिवसेनेत प्रवेश करीत आहेत, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. 


विशेष म्हणजे, याबाबत माजी आमदार विलास लांडे किंवा त्यांच्या समर्थकांकडून याबाबत कोणत्याही अधिकृत वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. 


आगामी विधानसभा निवडणकीत भोसरी विधानसभा मतदार संघातून तीव्र दावेदार असलेले माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादीकडून इच्छुक नसल्याचे जाहीर केले होते. मात्र कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणार असेही त्यांनी स्पष्ट केले होते. राष्ट्रवादीकडून माजी विरोधी पक्षनेता दत्ता साने इच्छुक आहेत. त्यातच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही नवीन चेह – यांना संधी देण्याचे सूतोवाच भोसरीत झालेल्या कार्यक्रमात केले होते. दरम्यान पक्ष अपक्ष किंवा शिवसेना अशी चर्चा लांडे यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र युतीन झाल्यास लांडे शिवसेनेचे उमेदवार असतील, असेही बोलले जात होते. दरम्यान, लांडे आपल्या प्रमुख सहका – यांसोबत मुंबईतील ‘ मातोश्री बसून आहेत. आज त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले जाईल, अशी गुप्त चर्चा सध्या सुरू झाली आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडून माहिती घेतली असता ते म्हणाले की , राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार विलास लांडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. शहरातील काही लोकांकडून ही चर्चा माझ्या कानावर आलेली आहे. बुधवारी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माझी त्यांच्याशी चर्चा झाली होती. काही घरगुती कारणास्तव ते आंदोलनाला उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर त्यांच्याशी माझी चर्चा झालेली नाही. अधिकृत माहिती मिळाल्यास माझी भूमिका व्यक्त करेन .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group