देहूगाव येथे सासू आणि मुलासोबत निघालेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

देहूगाव येथे सासू आणि मुलासोबत निघालेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पिंपरी l प्रतिनिधी

संत तुकाराम महाराज मंदिर, देहूगाव येथून सासू आणि मुलासोबत दुचाकीवरून जात असलेल्या महिलेचे मंगळसूत्र दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 1) रात्री सव्वाआठ वाजता घडली.

पूजा सचिन झेंडे (वय 27, रा. देहूगाव, पुणे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार,फिर्यादी त्यांच्या सासू पार्वती आणि मुलगा रिशान  दुचाकीवरून जात होते. ते देहूगाव कमानीच्या पुढे ग्रामपंचायत समोर आले असता दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 90 हजार रुपये किमतीचे 27 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून चोरून नेले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गज्जेवार तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *