Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘राज्यातील एमआरआय, सीटी – स्कॅन व पीईटी सीटी – स्कॅन प्रकल्पांना गती देणार’; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या एमआरआय, सीटी स्कॅन आणि पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांच्या प्रगतीचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सविस्तर आढावा घेतला. मुंबई आणि नागपूर क्लस्टरमधील विविध प्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना रुग्णांना दर्जेदार व अत्याधुनिक निदान सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

एमआरआय, सीटी स्कॅन आणि पीईटी सीटी स्कॅनबाबत मंत्रालयात आढावा बैठक (मुंबई क्लस्टर, नागपूर क्लस्टर) झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी,ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता,दूरदृष्य प्रणालीद्वारे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे, छत्रपती संभाजीनगर,मिरज, कोल्हापूर, बारामती, पुणे, नांदेड, लातूर, सोलापूर, चंद्रपूर, अंबाजोगाई, सिंधुदुर्ग, नागपूर, यवतमाळ, अकोलाचे अधिष्ठाता उपस्थित होते.

हेही वाचा – पोश’ कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करावी’; मंत्री ॲड. आकाश फुंडकर  ‘

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की,एमआरआय, सीटी स्कॅन आणि पीईटी सीटी स्कॅन या सुविधा रुग्णांच्या अचूक व वेळेवर निदानासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी शासन आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे. रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सुविधा विस्तार, देखभाल आणि कार्यक्षम अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात येत आहे,

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक निदान सुविधा उभारण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार असून, सर्वसामान्य रुग्णांना गुणवत्तापूर्ण आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध होतील, असा विश्वासही मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button