breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कासारवाडीतील सफाई कर्मचाऱ्यांना युवासेनेकडून मास्क,सॅनिटायझर व हॅन्डग्लोजचे वाटप
पिंपरी – युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी युवासेनेकडून कासारवाडीतील सफाई कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर व हॅन्डग्लोजचे वाटप करण्यात आले.
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आदित्य जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता अविरत सेवा करणाऱ्या कासारवाडी येथील सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझर व हॅन्डग्लोझचे वाटप करण्यात आले. यावेळेस समाजसेविका शिलामामी जाधव, आरोग्य अधिकारी धनश्री जगदाळे, रवी नगरकर, संजय पिंपळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी विभागसंघटक निलेश हाके यांनी केले होते.