पिंपरी / चिंचवड

पालघन बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

पालघन बाळगल्या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 23) दुपारी साडेचार वाजता वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे करण्यात आली.

गणेश जगन्नाथ सुतार (वय 25, रा. वेताळ नगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस शिपाई रोहित पिंजरकर यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश सुतार याच्या ताब्यात बेकायदेशीर पालघन (लांब कोयता) असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून गणेश सुतार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 400 रुपये किमतीचा लांब कोयता पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button