पिंपरी / चिंचवड

कोयता बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

सार्वजनिक ठिकाणी कोयता बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 10) रात्री साडेनऊ वाजता सदगुरुनगर, भोसरी येथे करण्यात आली.

अजय विठ्ठल कदम (वय 19, रा. चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सचिन सातपुते यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय कदम याने सार्वजनिक ठिकाणी कोयता बाळगला. याबाबत भोसरी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली आणि अजय याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून 200 रुपये किमतीचा कोयता जप्त केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button