पिंपरी / चिंचवड

थेरगावमध्ये बसची दुचाकीला धडक : तरुणाचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

पिंपरी l प्रतिनिधी

थेरगाव येथील बारणे कॉर्नरवर मंगळवारी (दि. 28) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास एक अपघात झाला. खाजगी बस चालकाने बस हायगयीने, भरधाव वेगात चालवून एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

शुभम बबन गायकवाड (वय 20, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नंदू ज्ञानेश्वर लोखंडे (वय 22, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. लोखंडे यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका खाजगी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोखंडे आणि त्यांचा मित्र मयत शुभम गायकवाड हे दोघेजण त्यांच्या दुचाकीवरून बारणे कॉर्नर येथून जात होते. त्यावेळी आरोपी बस चालकाने त्याच्या ताब्यातील बस भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी आणि त्यांचा मित्र शुभम गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यात शुभम गायकवाड याचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button