पिंपरी / चिंचवड

किरकोळ वादातून तरुणास मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

कंपनीत झालेल्या किरकोळ वादातून चार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री साडेदहा वाजता ए जी आय ओफार्मासिटीकल प्रा ली या कंपनीत घडली.

कृष्णा नवनाथ खरात (वय 18, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठायात फिर्याद दिली आहे. अमीर शेख, अभिषेक वंजारी, रणजीत, आदित्य (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीत झालेल्या वादाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ व धमकी दिली. अमीर शेख याने सिमेंटच्या गट्टूने, अभिषेक वंजारी याने स्टीलच्या डब्याने, रणजीत याने बेल्टने आणि आदित्य याने हातातील लोखंडी कड्याने मारहाण केली. यात फिर्यादी यांच्या खांद्याला, छातीला, डोक्याला, पायाला दुखापत झाली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button