breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“तुम्ही तुमचं काम करा, जे…”; नवनीत राणा यांचा संजय राऊतांना खोचक टोला

अमरावती |

अमरावती शहरात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी दगडफेक, जाळपोळ झाल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भाजपाने पुकारलेल्या बंददरम्यान समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत पाच पोलिसांसह नऊ जखमी झाले. शहरातील काही धार्मिक स्थळांसमोर नासधूस करण्यात आल्याने वातावरण चिघळले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. दरम्यान, प्रशासनाने ४ दिवसांसाठी कर्फ्यू लागू केला आहे. अफवा पसरवण्यावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील इंटरनेट सेवा देखील खंडीत करण्यात आली.

अमरावतीत झालेल्या हिंसाचारानंतर खासदार नवनीत राणा यांनी तिथल्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांची राज्यसरकारवर टीका केली आहे. टीव्ही नाईन मराठी सोबत बोलतांना अमरावतीतील हिंसाचार यंत्रणेचे अपयश असल्याचे राणा म्हणाल्या. तसेच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. नवनीत राणा म्हणाल्या, “आमच्या अमरावती जिल्ह्यात असं कधीही घडल नाही. पहिल्यांदा अशी घटना घडली. त्यामुळे मला खूप दु:ख वाटत आहे. या हिंसाचारात जे जखमी झाले तसेच ज्यांचे नुकसान झाले त्यांना सरकारने भरपाई द्यावी. यामध्ये काही राजकीय लोक आपले हात धूऊन घेत आहेत.”

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी निवडणुकीच्या तोंडावार इतर पक्ष हे घडवून आणतात, असा आरोप केला आहे. यावर बोलतांना नवनीत राणा म्हणाल्या, देशातील बाकी राज्याचं आमच्या जिल्ह्याशी काय घेण-देण आहे. ही घटना हाताळण्यात तुम्ही अपयशी ठरले आहात. तसेच राणा यांनी संजय राऊतांवर देखील टीका केली आहे. “संजय राऊत अमरावतीबद्दल बोलत आहेत. ते कोणत्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. माझ्या आमरावतीच्या लोकांबद्दल तुम्ही कशी प्रतिक्रिया देत आहात?, आम्ही आमच्या जिल्ह्याबद्दल बोलण्याचं तम्हाला निमंत्रण दिल नाही. तुम्ही तुमचं काम करा जे तुम्हाला बरोबर येत नाही, ते आधी शिकून घ्या.”, असा खोचक टोला नवनीत राणा यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button