breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेश

Whatsapp मध्ये मोठा बदल! आता ४ मोबाईलवर एकच अकाउंट चालणार

Whatsapp : मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरबद्दल घोषणा केली आहे. मार्क झुकरबर्ग यांनी या नवीन फीचरबद्दल फेसबुक पोस्टवरून माहिती दिली आहे. वापरकर्त्यांना या फीचरच्या मदतीने आपले एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट एकाच वेळी आता चार वेगवेगळ्या डिव्हाईसवर वापरता येणार आहे. म्हणजे एकाच वेळी चार डिव्हाइसमध्ये तुम्हाला लॉग इन करता येणार आहे.

मार्क झुकरबर्ग यांनी नुकत्याच केलेल्या आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, आजपासून तुम्ही चार फोनमध्ये तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट लॉग इन करू शकता, असं म्हटलं आहे. हे फिचर आधी बीटा टेस्टिंगसाठी जारी करण्यात आले होते.

मात्र आता सर्व युजर्सना या फीचरचा आता लाभ घेता येणार आहे. यामध्ये प्रायमरी डिव्हाईस सोडून इतर डिव्हाईसवर लॉग इन करताना तुमचा मोबाईल नंबर टाकला की प्रायमरी डिव्हाईसवर (मूळ मोबाईलवर) ओटीपी आला की तो टाकल्यानंतर दुसऱ्या डिव्हाईसवर व्हॉट्सअ‍ॅप सुरू होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button