ताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘हा’ 27 रुपयांचा शेअर 2420 रुपयांवर

 

अदानी ट्रान्समिशनच्या शेअरची किंमत गेल्या एका महिन्यात 2032 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढली आहे. महिनाभरात या शेअरमध्ये सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक 1578 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढला आहे. या स्टॉकने 6 महिन्यांत सुमारे 55 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 1.20 लाख रुपये मिळाले असते. दुसरीकडे, 6 महिन्यांपूर्वी एखाद्याने या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 1.55 लाख रुपये मिळाले असते.

त्याचप्रमाणे, जर आपण गेल्या 7 वर्षांच्या प्रवासावर नजर टाकली तर, 31 मार्च 2015 रोजी, हा स्टॉक NSE वर 27.60 रुपयांवर बंद झाला तर 24 मार्च 2022 ला हा स्टॉक NSE वरच 2420 रुपयांवर बंद झाला. म्हणजेच 7 वर्षांच्या कालावधीत हा स्टॉक 87.7 पट चालला आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने 7 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 87.70 लाख रुपये मिळाले असते. दरम्यान, अदानी ट्रान्समिशन स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2,464.30 रुपये आहे, तर स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक 821.05 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप रु. 265,978 कोटी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button