ताज्या घडामोडीमुंबई

यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिले २ कोटीचे गिफ्ट, ५० लाखांचे घड्याळ!

मुंबई | प्राप्तिकर विभागाने मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह कंत्राटदारांवर २५ फेब्रुवारीला छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये प्राप्तिकर विभागाला मोठी माहिती मिळाली आहे. जाधव यांची एक डायरी प्राप्तिकर विभागाच्या हाती लागली आहे. या डायरित कोट्यवधींच्या संशयित व्यवराहांची नोंद असल्याचं समोर आलं आहे. डायरित ‘मातोश्री’ ला ५० लाख रुपयांचे एक घड्याळ दिल्याची नोंद आहे. तसंच गुढीपाडव्याला २ कोटी रुपयांची एक भेट दिली असल्याचंही नमूद आहे, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मुंबईतील कलानगर येथील घराचं नाव हे ‘मातोश्री’ आहे. या पार्श्वभूमीवर यशवंत जाधव यांची चौकशी करण्यात आली. घड्याळ आपण आपल्या आईला दिली होती. आणि गुढीपाडव्याची २ कोटींची भेट ही आईच्या स्मरणार्थ गरजूंना भेटवस्तू दिल्या होत्या, असं स्पष्टकरण यशवंत जाधव यांनी दिलं आहे. मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात आलं आहे.

संशयित नोंदशिवाय न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत झालेल्या व्यवहारांचीही प्राप्तिकर विभाग चौकशी करत आहे. या कंपनीचे मालक कंत्राटदार विमल अग्रवाल हे आहेत. बॉम्ब डिस्पोजल सूट घोटाळा आणि सट्टेबाजी प्रकरणी अग्रवाल यांची यापूर्वीही पोलीस आणि ईडीने चौकशी केली आहे.

मुंबई महापालिकेच्या ३० कोटींच्या वेगवेगळ्या कंत्राटांसाठी यशवंत जाधव यांनी विमल अग्रवाल यांची बाजू घेतल्याचा संशय आहे. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव ज्या भायखळ्याच्या आमदार आहेत त्यांनी २०१९ ला प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. यातूनच प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कोलकाता येथील या कंपनीशी व्यवहाराची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली. कंपनीने जवळपास १५ कोटी रुपये दिले होते. या पैशातून जाधव आणि त्यांच्या कुटुंबाने भायखळ्यातील एका इमारतीच्या खरेदीसाठी हे पैसे गुंतवले. जाधव कुटुंबाने नंतर हे पैसे कंपनीला परत केले होते. यानंतर कंपनीने ते न्यूजहॉक मल्टीमीडिया कंपनीला ते हस्तांतरीत केले, असं प्राप्तिकर विभागाच्या तापासून समोर आलं आहे.

३१ फ्लॅट खरेदी केले, हवालाद्वारे दिले पैसे!

न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे कथित रित्या भायखळ्यातील बिलकाडी चेंबर्समध्ये ३१ फ्लॅट विकत घेण्यात आले. जाधव यांनी कथितरित्या ४ ते ५ भाडेकरूंना ३० ते ३५ लाख रुपये दिले होते. हवालाद्वारे भाडेकरूंना पैसे दिले गेले होते. प्राप्तिकर विभाग इतर ४० मालमत्तांप्रकरणी चौकशी करत आहे. या मालमत्ता जाधव यांच्याशी संबंधित असल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे.

जाधव यांची सासू सुनंदा मोहिते यांनी भायखळ्यात इंपीरियल क्राउन नावाचे एक हॉटेल खरेदी केले होते. हॉटेल न्यूजहॉक मल्टीमीडिया कंपनीने भाडे तत्त्वार घेतले. यानंतर मुंबई महापालिकेने न्यूजहॉक कंपनीला क्वारंटाइन सेंटरचे कंत्राट दिले. हॉटेल १.७५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे. पण एका वर्षानंतर ते २० कोटी रुपयांना विकण्यात आले. हॉटेलच्या खरेदीत प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेडची भूमिकेची चौकशी करण्यात येत आहे.

प्राप्तिकर विभागाने मुंबई महापिलाकेचे स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या कार्यकाळातील म्हणजे एप्रिल २०१८ पासून ते आतापर्यंतच्या सर्व मंजूर कंत्राटांची माहिती प्राप्तिकर विभागाने मागितली आहे. याशिया सर्व कंत्राटदार आणि मुंबई महापालिकेने दिलेल्या निधीचा तपशील मागवला आहे. विमल अग्रवाल हे जादव यांच्यासोबत इतर कंपन्यांमध्येही भागीदार असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या तपासात समोर आले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button