breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

यामी गौतम झुंजतेय या गंभीर त्वचारोगाशी…

‘फेस ऑफ द फेअरनेस क्रीम’ यामी गौतम झुंजतेय या गंभीर त्वचारोगाशी…

यामी गौतम म्हणजे फेअरनेस क्रीमवर सर्वसामान्य मुलींना भाळायला लावणारा आश्वासक चेहरा. दिसायला गोरीपान,सुंदर अशा या मुलीनं आज जगभरातल्या मुलींना फेअरनेस क्रीम वापरण्यास भाग पाडलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सिनेमांमध्ये यायच्या आधीपासनं यामी त्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीचा चेहरा होती आणि तिथेच तिला खरी प्रसिद्धी मिळाली. पण त्या जाहिरातीतनंच तिच्यातील आत्मविश्वासाची आणि अभिनयाची चमक दिसली आणि तिला बॉलीवूडची दारं खुली झाली. केवळ सिनेमांचा प्रेक्षकवर्ग नाही तर सोशल मीडियावरही तिचा असा स्वतःचा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच तिथेही चर्चेत असते. पण आता तिनं असं काही सोशल मीडियावर पोस्ट केलंय की त्यामुळे एका वेगळ्याच चर्चेला पेव फुटलंय. तिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधनं स्वतःला झालेल्या एका गंभीर त्वचारोगाची माहिती दिलीय.

त्या पोस्टमधनं तिला होणारा त्रास उघडपणे समोर आलाय. तिनंही एक अभिनेत्री,पब्लिक फीगर असताना काहीही लवपून नं ठेवता सगळं खरं-खरं सांगितलं आहे. तिला ‘केराटोसिस पिलारिस’ नावाचा गंभीर त्वचारोग झाला आहे. मागच्या अनेक वर्षांपासनं ती या आजाराचा सामना करीत आहे. यामी म्हणाली,”या आजाराविषयी जाणून घेण्यापासून ते सोशल मीडियावर याबाबत उघडपणे व्यक्त होण्यापर्यंतचा प्रवास बराच आव्हानात्मक होता. जेव्हा लोक शूटिंगच्या वेळी पहायचे तेव्हा ते हे सर्व कसं लपवता येऊ शकतं याबाबत मला सल्ला द्यायचे. हे सर्व जसं आहे तसं स्वीकारण्यासाठी मला अनेक वर्ष लागली. पण आता सर्वांसमोर उघडपणे याबाबत बोलल्यावर आणि त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मला खूप मोकळं वाटत आहे”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button