breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जागतिक दर्जाची लाँड्री- ड्रायक्लिनिग सेवा आता पिंपरी-चिंचवडमध्ये

  •  ‘टम्बल ड्राय’ च्या फॅक्टरी आउटलेटचा दमदार शुभारंभ
  • शहरातील विविध २५ ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात आता जागतिक दर्जाची लाँड्री व ड्रायक्लिनिग सुविधा उपलब्ध झाली आहे. ‘टम्बल ड्राय’ या आंतरराष्ट्रीय कंपनीचे आउटलेटचा शुभारंभ तळवडे येथे करण्यात आला, सुहास ताम्हाणे, सुमित म्हेत्रे ,व तुषार म्हेत्रे या युवकांनी एकत्र येऊन या व्यवसायास सुरुवात केली .

तळवडे- त्रिवेणीनगर येथील शिवरकर चौक येथे ‘टम्बल ड्राय’च्या फॅक्टरी आउटलेटचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी महापौर तथा नगरसेवक राहुल जाधव , शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, उद्योजक कार्तिक लांडगे, नगरसेविका अश्विनी जाधव, स्वीनल म्हेत्रे , माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, नगरसेविका संगिता ताम्हाणे, नगरसेवक पंकज भालेकर, प्रविण भालेकर, पोर्णिमा सोनवणे, नगरसेवक कुंदन गायकवाड, यश साने, उद्योजक निलेश नेवाळे, गणेश मळेकर, प्रविण नेवाळे, निलेश भालेकर, नगरसेवक निलेश बारणे, शितल शिंदे, नगरसेविका नम्रता लोंढे, स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, पांडुरंग भालेकर , माजी नगरसेवक शांताराम भालेकर, दिनेश भालेकर, संतोष मोरे आदी उपस्थित होते.
‘टम्बल ड्राय’चे संचालक सुहास ताम्हाणे म्हणाले की, जर्मन टेक्नोलॉजी वुलमार्क मान्यताप्राप्त मिशनरी असलेली शहरातील पहिली लाँड्री व ड्रायक्लिनिंग सुविधा आता सुरू होत आहे. ऑरगॅनिक केमिकल, स्टीम प्रेस आणि पॅकिंग सुविधा आहे. विशेष म्हणजे, थर्मल टॅनिंग प्रक्रिया असून, ग्राहकांना घरपोच सुविधा देणारी शहरातील पहिली संस्था असणार आहे. तसेच, हेल्पलाईन, अँड्राईड मोबाईल ॲप, वेब ॲप्लिकेशन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा मिळणार आहेत.

पहिल्या टप्प्यामध्ये शहरातील रावेत, पुनावळे, निगडी प्राधिकरण, आकुर्डी, चिखली, तळवडे, पिंपरी, या ठिकाणी कलेक्शन सेंटर सुरू झाले आहेत तर भोसरी आणि चिंचवड आदी भागांमध्ये लवकरच कलेक्शन सेंटर सुरू होणार आहेत. पँन्ट-शर्ट, कुर्ता, ब्लेझर, साडी, पडदे, सोपा कव्हर, बेडशीट, बॅग, पर्स चप्पल आणि शूटसुद्धा ग्राहकांना स्वच्छ करुन मिळणार आहेत.

गोरगरिबांची दिवाळी होणार ‘चकाचक’…
‘टम्बल ड्राय’ व्यवस्थापनाने शुभारंभाच्या निमित्ताने आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘जुने कपडे द्या आणि गोरगरिबांची दिवाळी साजरी करा’ असा विधायक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘‘तुमचे जुने पण न फाटलेले कपडे आम्हाला द्या. आम्ही त्याला स्वच्छ करुन नवीन करणार आणि गोरगरिबांना दिवाळी भेट देणार..’’ असा संकल्प करण्यात आला आहे. त्यामुळे आता जुने कपडे टाकून देण्याची गरज नाही. सामाजिक बांधिलकी जपत दुर्लक्षित व्यक्तींना मदत करुया, असे आवाहन संचालक सुमित म्हेत्रे व तुषार म्हेत्रे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button