breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

आधुनिक सुविधांयुक्त स्मशानभूमीचे काम प्रगतीपथावर – तुषार कामठे

पिंपळे निलख |

पिंपळेनिलख येथे 2018 मध्येच नवीन स्मशानभूमीचे काम सुरू झाले आहे. महापालिका प्रशसानाने जुन्या स्मशानभूमीचे पत्रा शेड हटवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाचा (एनजीटी) अडथळा येत आहे. त्यामुळे नागरिक जुन्या स्मशानभूमीचा वापर करतात. असे असताना काँग्रेसच्या नेत्यांकाडून जुन्या स्मशानभूमीचा मुद्दा उपस्थित करुन राजकारण केले जात असल्याचे  माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी म्हटले आहे.

पिंपळे निलख येथील नव्या स्मशानभूमीसाठी तब्बल 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. 2018  मध्येच स्मशानभूमीचे काम चालू करण्यात आले. त्यामध्ये 4 बेडची अंत्यविधी शेड तयार आहे. मात्र, नागरिक जुन्या स्मशानभूमीचा वापर करीत आहेत. वास्तविक, जुनी स्मशानभूमी हटवण्यात येणार आहे. पत्रा शेडही काढून टाकण्यात येणार आहे. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाच्या तांत्रिक अडचणींमुळे जुनी स्मशानभूमी हटवण्यात आलेली नाही.

संबंधित ठेकेदाराला प्रशासनाने काळ्या यादीत टाकल्यामुळे काम थांबले होते. मात्र, आगामी काळात अत्याधुनिक सुविधा असलेली स्मशानभूमी नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. नव्या स्मशानभूमीच्या सीमाभिंतीचे काम पूर्ण झाले आहे. स्ट्रीटलाईट पोल बदलले आहेत. गोसावी समाजाची दफनभूमी सुशोभित केली आहे. अन्य कामांसाठी निविदा प्रक्रिया होणार असून, लवकरच कामे मार्गी लागणार आहेत, असा दावाही कामठे यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button