TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिघीत नवीन रायजिंगमेन पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात

आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते रविवारी कामाचे भूमिपूजन

पिंपरी l प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक चार दिघीसाठी भोसरी संप ते दिघी संपपर्यंत नवीन रायजिंगमेन पाईपलाईन टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ रविवारी (दि. 6) सकाळी दहा वाजता नवीन पाण्याच्या टाकीजवळ दिघी येथे होणार आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन होणार आहे.
भोसरी संपवरून दिघी दत्तगडाकडे येणारी पाण्याची पाईप लाईन ही 400 मिलीमीटर व्यासाची होती. त्यामुळे एक टाकी भरण्यासाठी सुमारे पाच तास लागत आहेत. टाकी खाली होण्यासाठी एक तास लागतो. पाण्याची टाकी दिवसातून चार वेळा भरली तरी दिवसाचे 20 तास टाकी भरण्यासाठी जातात. परिणामी टाकीतून पाणीपुरवठा न करता ममता चौकातून डायरेक्ट बायपास सिस्टीमद्वारे सध्या पाणीपुरवठा होत आहे.
इ प्रभागातील दिघी हा अतिशय दाट लोकवस्तीचा व पुणे आणि पिंपरी चिंचवडला जोडणारा मुख्य दुवा आहे. दिवसाआड पाणीपुरवठा असतानाही सध्या दिघीत 24 तास पाणीपुरवठा करावा लागत आहे. काही भागाला रात्रीचा पाणीपुरवठा करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना रात्री जागून पाणी भरावे लागते.
नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी 600 मिलीमीटर व्यासाची लोखंडी पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम झाल्यानंतर दिघी दत्तगडावरील पाण्याच्या टाक्या दोन ते अडीच तासात भरतील. यामुळे संपूर्ण दिघीला गडावरील टाकीतून चांगल्या दाबाने पाणीपुरवठा करता येणार आहे. यासाठी सुमारे सव्वासहा कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे काम लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते रविवारी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button