ताज्या घडामोडीमुंबई

महिला सक्षमीकरण, सुरक्षेला प्राधान्य देणारी मोटार रॅली; ‘वुमेन्स रॅली टू द व्हॅली’

मुंबई | महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा याला चालना देणारी ‘वुमेन्स रॅली टू द व्हॅली’ ही मोटार रॅली या वर्षी पुन्हा सुरू झाली आहे. वेस्र्टन इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन (डब्ल्यूआयआयए) यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ही रॅली शनिवार, १२ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. जिओ वर्ल्ड ड्राईव्ह बीकेसी येथून सकाळी आठ वाजता रॅली सुरू होणार असून नाशिक येथील अंबड येथे समाप्त होणार आहे.

डब्ल्यूआयआयए दरवर्षी हा उपक्रम आयोजित करते. करोना साथीमुळे गेल्या वर्षी रॅली होऊ शकली नाही. या वर्षी रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी १०६ स्पर्धकांनी नोंदणी केली असून यातील बहुतांश स्पर्धक मुंबईतील आहेत. या रॅलीमध्ये स्पर्धकांनी एक विशिष्ट संकल्पना घेऊन त्यानुसार मोटारीची सजावट करणे अपेक्षित असते. चालकांसह सहभागी असेलेल्यांची वेशभूषाही पाहिली जाते. त्यानुसार उत्कृष्ट मोटार सजावट, वेशभूषा, संकल्पना, मोटारीवरील संदेश यासाठीही पारितोषिके देण्यात येतात. यावेळी २०२० साली झालेल्या रॅलीच्या विजेत्यांना यावर्षीच्या रॅलीच्या पुरस्कार सोहळय़ात गौरविण्यात येणार आहे. रस्त्यांवर किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षित वाटणे महत्त्वाचे आहे. महिला या जगातील कोणतेही स्थान भूषविण्यास समर्थ आहेत. या दृष्टीने जनजागृती करणे हा या रॅलीच्या आयोजनामागील उद्देश आहे, असे डब्ल्यूआयआयएचे कार्यकारी अध्यक्ष नितीन डोसा यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button