breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

Women T20 : ऑस्ट्रलियाकडून भारताचा ४ गडी राखून पराभव

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी २० सामन्यात नाणेफेक जिंकत भारतीय महिला क्रिकेट संघाला फलंदाजी करण्यास सांगितलं. भारताने ९ गडी गमवून ११८धावा केल्या आणि विजयासाठी ११९ धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने ४ गडी आणि ५ चेंडू राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाकडून ताहिला मॅक्ग्राथने नाबाद ४२ धावांची खेळी केली. तर तिला जॉर्जिय वारहम चांगली साथ मिळाली.

ऑस्ट्रलियाचा डाव
एलिसा हीली आणि बेथ मूनी ही जोडी मैदानात उतरली. मात्र पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एलिसा हीली हीचा शिखा पांडेने त्रिफळा उडवला. ती अवघ्या ४ या धावसंख्येवर तंबूत परतली. त्यानंतर बेथ मूनी आणि मेग लेनिंगने डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी ३१ धावांची भागीदारी केली. मेग लेनिंगला राजेश्वरी गायकवाडने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेली एश गार्डनरही तग धरू शकली नाही. राजेश्वरी गायकवाडच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर एलिस पेरीही बाद झाली. दीप्ती शर्माने तिला तंबूचा रस्ता दाखवला. तर बेथ मुनीला बाद करत राजेश्वरीने तीन विकेट्स घेतल्या. निकोला कॅरी बाद झाल्याने ऑस्ट्रेलियावर दडपण वाढलं. मात्र ताहिला मॅक्ग्राथ आणि जॉर्जिया वारहमने विजय मिळवून दिला.

भारताचा डाव
भारताच्या फलंदाजीची सुरुवात अडखळत झाली. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा स्वस्तात बाद झाल्या. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सही जास्त वेळ मैदानात तग धरू शकली नाही. १३ चेंडूत ७ धावा करून बाद झाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाची बाजू सावरली. २० चेंडूत २८ धावांची खेळी केली. मात्र वारहमच्या गोलंदाजीवर हिलीने तिला यष्टीचीत केलं. ते तंबूत परतत नाही तिथपर्यंत यास्तिक भाटिया धावचीत झाली. रिचा घोषही कमाल करू शकली नाही. २ या धावसंख्येवर असताना तिला कॅरेने त्रिफळाचीत केलं. त्यानंतर तळाच्या शिखा पांडे आणि रेणुका सिंगही त्रिफळाचीत होत तंबूत परतल्या. तर पूजा वस्त्राकार एकाकी झुंज देत २६ चेंडूत ३७ धावा केल्या. या खेळीत ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.

भारतीय संघ- शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, ऋचा घोष, पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, रेणुका सिंह, राजेश्वरी गायकवाड

ऑस्ट्रेलिया संघ- एलिसा हीली, बेथ मूनी, मेन लेनिंग, एश गार्डनर, एलिस पेरी, ताहिला मॅक्ग्राथ, निकोला कॅरी, सोफी मॉलिनुक्स, जॉर्जिय वारहम, डार्लिनग्टन, टायला

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button