पिंपरी / चिंचवडपुणे

नामांकित ज्वेलर्स शॉपमधून सोन्याच्या अंगठ्या चोरणा-या सराईत महिलेस अटक

पिंपरी | प्रतिनिधी

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित ज्वेलर्स शॉपमध्ये खरेदीच्या बहाण्याने जाऊन अंगठ्या चोरणाऱ्या सराईत महिलेस हडपसर पोलिसांनी अटक केली. या महिलेने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात केलेल्या बारा चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तिच्याकडून सव्वा सहा लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. पुनम परमेश्वर देवकर (वय 42) असे अटक करण्यात आलेल्या अंगठीचोर महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील चंदुकाका सराफ अँड सन्स या सराफा दुकानातून 23 नोव्हेंबर रोजी एका महिलेने सेल्समनचे लक्ष विचलित करून सोन्याची अंगठी चोरून नेली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शहरातील पु ना गाडगीळ, रांका ज्वेलर्स, मलबार, ब्लू स्टोन अशा नामांकित ज्वेलर्स शॉपमध्ये देखील अशा प्रकारचे गुन्हे घडले होते. त्या सर्व दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला त्यामध्ये दिसून आली.

हडपसर पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारे तपासाला सुरुवात केली. यामध्ये दिसणारी महिला हडपसर वरून दिल्ली वाडीपर्यंत गेल्याचे सीसीटीव्हीचा तपासणीत दिसून आले. दरम्यान गुरुवारी हडपसर पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी सराफा दुकान परिसरात गस्त घालत असताना त्यांना संशयित महिला दिसून आली. त्यांनी या महिलेला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता ती गडबडून गेली.

त्यानंतर पोलिसांनी संशयित महिलेला पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली. त्यात तिने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून बारा चोरीच्या घटना उघडकीस आणत सहा लाख 23 हजार रुपये किमतीच्या 12 सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button