breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

योग्यवेळेत उपचार मिळाल्यास स्त्रिया कॅन्सरपासून मुक्त होऊ शकतात – सुलभा उबाळे

  • मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रस्टन कॉलनीत मोफत ‘ब्रिस्ट कॅन्सर’ तपासणी शिबिर
  • परिसरातील महिलांनी घेतला शिबिराचा लाभ

पिंपरी / महाईन्यूज

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने पिंपरी-चिंचवडमध्ये जनसेवा सप्ताह सुरू आहे. त्याअंतर्गत महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका वैशाली समीर मराठे व शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांच्या वतीने महिलांसाठी मोफत ‘ब्रिस्ट कॅन्सर’ या तपासणी शिबिराचे गुरुवारी (दि.१७) रोजी आयोजन करण्यात आले. या शिबिराचा शहरातील महिलांनी लाभ घेतला. तज्ञ डॉक्टरांनी काहींना पुढील उपचाराबाबत समुपदेशन केले. तर, काहींना स्वतःची काळजी घेण्यासंदर्भात टिप्स दिल्या.

चिंचवड येथील रस्टन कॉलनी शॉप नं. ५ व ६ येथील गुरुकृपा हौसिंग सोसायटी येथे गुरूवारी (दि. १७) सकाळी नऊ ते साडेबारा दरम्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका सुलभा उबाळे आणि जिल्हा संघटिका शैला खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आले. शहर संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहर संघटक अनंत को-हाळे, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस मयूर जयस्वाल, रेश्मा सौंदणकर, मीना डेरे, कमल गोडांबे, उषा आल्हाट, शिल्पा अनपन, रजनी वाघ, सुनिता डोईफोडे, विभागप्रमुख श्रीमंत गिरी आदी, सुरज बराटे आदी मान्यवर उपस्थित होते.

सुलभा उबाळे म्हणाल्या, वाढत्या आधुनिकीकरणामुळे स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. पाश्चात्य जगातील हा आजार आज आपल्या देशात हातपाय पसरत आहे. आज जगभर सर्व कॅन्सरमध्ये स्तनाच्या कॅन्सरवर सर्वाधिक संशोधन चालु आहे. योग्यवेळेत उपचार केल्यास जास्तीत जास्त स्त्रिया सुद्धा कॅन्सर पासून मुक्त होऊ शकतात. गरज आहे ते रुग्णाने योग्य वेळात डॉक्टरकडे जाण्याची. घरातील स्त्री ही संपूर्ण घराचा आधार असते, त्यामुळे तिने स्वतःकडे तितकेच लक्ष्य देणे आवश्यक आहे, नाहीतर कुटुंबाचा डोलारा कोसळु शकतो.

वैशाली समीर मराठे म्हणाल्या, स्तनाचा कर्करोग स्त्रियांच्यात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. त्यामुळे स्त्रीयांनी स्वतः पुढे येऊन महिन्यात एकदा तरी ही शास्रशुद्ध तपासणी करावी. त्याने कॅन्सर लवकर पकडता येऊ शकतो. त्यासाठी महिलांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न सुरु आहे. जेणेकरून रुग्ण महिलेस उपचार वेळेत मिळाल्यास तिच्यावरील कुटुंब सुरक्षित राहू शकेल.

या शिबिरात चिंचवड परिसरातील ६० ते ७० महिलांची तपासणी करण्यात आली. त्यातील काहींना पुढील उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला देण्यात आला. तर, काही महिलांना स्वतःची काळजी घेण्यासंदर्भात समुपदेशन करण्यात आले. पिंपरी विधानसभा उपशहर संघटिका डॉ. वैशाली कुलथे, डॉ. तृप्ती दारपवार यांनी शिबिरात सहभागी झालेल्या महिलांची तपासणी केली.

कार्यक्रमाचे नियोजन उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे यांनी केले. शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन करून तो यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योगदान दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button